बागलाण
(जिल्हा नाशिक , महाराष्ट्रराज्य ):
बागलाण तालुका हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. नाशिक पासून हा तालुका ८४ कि.मी अंतरावर आहे. हा तालुक्यात वर्ग एक च्या अधिकारीचे देव मामलेदार मंदिर भारतात प्रसिद्ध आहे. हा तालुका नाशिक जिल्यातील प्रथम मोठा तालुका आहे.
लोकसंख्या
बागलाण तालुका
भारताची जनगणना २०११ नुसार, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याची एकूण लोकसंख्या ३,७४,४३५ आहे.
१,९३,०७२
पुरुषांची संख्या:
१,८१,३६३
स्त्रियांची संख्या:
१,३५२ चौ.किमी
क्षेत्रफळ
३,७४,४३५
एकुण
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
बागलाण
तालुक्यातील विभागनिहाय योजना
१)कृषी विभाग, पंचायत समिती बागलाण अंतर्गत योजना माहिती :
१)डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सदर योजना अनुसूचित जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते योजनेअंतर्गत २)बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत) व (क्षेत्राबाहेरील) सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते यामध्ये 3) प्रधानमंत्री / शबरी / रमाई/ इंदिरा आवास घरकुल योजना पंचायत समिती, बागलाण
२) प्रधानमंत्री / शबरी / रमाई/ इंदिरा आवास घरकुल योजना पंचायत समिती, बागलाण
ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
३) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान
१) महाराष्ट्रराज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM)
२) समूहांना कर्ज पुरवठा
३) समुदाय गुंतवणूक निधी (CIF)
४ )पशुसंवर्धन विभाग योजना
४ )पशुसंवर्धन विभाग योजना
1) योजनेचे नाव - राज्यस्तरीय नाविन्य पूर्ण योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी/ २ म्हशींचे गट वाटप करणे
2) योजनेचे नाव - राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अंशत : ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढी पालनाव्दारे शेतक-यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.
3. योजनेचे नाव - १००० मांस लकुक्कुट पक्षी संगोपाना द्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे
५) आरोग्य विभाग योजना पंचायत समिती बागलाण
१) कुटुंब नियोजन
२) आयुष्मान भारत
३) मातृत्व अनुदान योजना
४) जननी सुरक्षा योजना
६ ) एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बागलाण-१/२
१ ) टाकाऊ पासून टिकाऊ
२ ) बाहुली घर
३) बाल कोपरा
४ ) स्तनपाना बाबत प्रशिक्षण
५ ) परसबाग
बागलाण
तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे

मुल्हेर (Mulher): ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा शिवकालीन किल्ला
सह्याद्री पर्वताच्या उत्तरदक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, तांबोळ्या असे गड आहेत. तर दुसर्या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत.

साल्हेर (Salher): सह्याद्रीतील सर्वात उंच
साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो.

हरगड (Hargad): सेलबारी रांगेतील किल्ला
इतिहासात फारसा या गडाचा उल्लेख नाही कारण येथे कोणती मोठी लढाई झाली नाही. मुल्हेर गावात गेल्यावर हरगडचे दर्शन होते. समोर दिसणारा मुल्हेर,डावीकडे मोरागड आणि उजवीकडचा हरगड. या गडाची उंची मुल्हेरपेक्षा थोडी जास्त म्हणजे १३५७ मीटर इतकी आहे.

पिसोळ (Pisol): ऐतिहासिक शिवकालीन आणि मुस्लिम साम्राज्यातील खुणा असलेला किल्ला
तेराव्या शतका पर्यंत बागलाण हा प्रांत होता. देवगिरीचे यादवराज्य संपवल्यावर इ.स. १३४० मध्ये नामदेव नावाचा राजा राज्य करू लागला.इ.स. १६३७ मध्ये हा प्रांत मुस्लिम साम्राज्याने जिंकला. याच काळात राठोडवंशीय बागूल राजे पिसोळसह विविध किल्ल्सावर राहत असत. बागूल घराण्याताील राजांमुळे बागलाण हे नाव पडले. नामदेव हा बागुलवंशीय ३२ वा राजा होता. त्याने गवळी राजा महेश याचा पराभव करून साल्हेर, मुल्हेर व पिसोळ किल्ले जिंकले. त्यावेळी जंगछाया नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्याही त्याने पराभव केला.
कायदा
केद्रिय माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील कलम 4 अंतर्गत प्रसिदधकरावयाच्या 17 मुद्याबाबतची माहिती जिल्हा परिषद, नाशिक. - पंचायत समिती, बागलाण (सन 2024-25)
| नियंत्रणाची यंत्रणा | ||
|---|---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक | जिल्हा परिषद नाशिक | |
अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | ||
| उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिक्षणाधीकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा कृषि अधिकारी | ||
| गटविकास अधिकारी सहा.गटविकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी | पंचायत समिती बागलाण | |
ग्रामपंचायत अधिकारी | ग्रामपंचायत | |
बागलाण
भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती
1) भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ
भौगोलिक वैशिष्ट्ये : स्थान - सिन्नर शहर नाशिक जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस, नाशिक पुणे रस्त्यावर वसलेले आहे. उंची – शहराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६५१ मीटर (२,१३६ फुट) आहे. भूभाग – सिन्नर हे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील एक शहर आहे. नाशिक जिल्ह्यातील नकाशावर हे शहर निफाड व दिंडोरी यांच्या दक्षिणेला आहे.
2) सांस्कृतिक वैशिष्ट्ये :
सांस्कृतिक वैशिष्ट्ये :सिन्नर सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्रामुख्याने ऐतहासिक वारसा, उत्कृष्ठ मंदिर आणि मराठा साम्राज्याशी असलेले संबंध यावर आधारित आहेत. येथील गोंदेश्वर मंदिर हे १२ व्या शतकात बांधलेले हेमाडपंती शैलीतील एक उत्कृष्ठ उदाहरण असून ते शैवपंचायतन परंपरेचे प्रतिक आहे. या व्यतिरिक्त, शहरात भैरवनाथ मंदिर, शैनेश्वर मंदिर आणिभव्य महागणपतीची मूर्ती यासारखी धार्मिक स्थळे आहेत, ज्यामुळे सिन्नर धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
3) धार्मिक महत्व-
धार्मिक महत्व- सिन्नरमध्ये गोंदेश्वर मंदिरासोबत अनेक लहानमोठी मंदीर आहेत भैरवनाथ मंदिर – हे सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेले मंदिर आहे, ज्यांच्या जिर्णोदधार करण्यात आले आहे. महागणपती मूर्ती – येथे एक भव्य गणपतीची मूर्ती आहे.
प्रशासकीय संरचना
पंचायत समिती बागलाण
अधिकारी
श्री व्ही.(भैया) व्ही सावंत
सहाय्यकगट विकास अधिकारी पंचायत समिती बागलाण
श्री अतुल जयवंतराव पाटील
गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती बागलाण
कशासाठी प्रसिद्ध:
धम्मगिरी विपश्यना केंद्र:
जगातील एक मोठे ध्यानकेंद्र.
ट्रेकिंग व साहस पर्यटन:
कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड यांसारखे लोकप्रिय ट्रेक.
निसर्गसौंदर्य:
पावसाळ्यातील धबधबे, हिरवीगार दऱ्या, विलोभनीय नजारे.
चित्रपट चित्रीकरण:
सुंदर निसर्गामुळे बॉलिवूड चित्रपटांसाठी आवडते ठिकाण.
प्रेक्षणीय स्थळे – इगतपुरी
1.धम्मगिरी विपश्यना केंद्र:
जगातील एक मोठे ध्यानकेंद्र, जगभरातून साधक येथे येतात.
2. कळसुबाई शिखर
:महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर (१,६४६ मी.) – प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाण.
3.भवली धरण व धबधबे:
पावसाळ्यात विशेष आकर्षक असलेले धरण व धबधबे.
4.त्रिंगलवाडी किल्ला:
ऐतिहासिक डोंगरकिल्ला, सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य.
5.घाटांदेवी मंदिर:
घाटांचे रक्षण करणाऱ्या देवीचे प्रसिद्ध मंदिर.
6.वैतरणा धरण / अपर वैतरणा तलाव:
रमणीय परिसर, तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे जलाशय.
7. कॅमल व्हॅली:
पावसाळ्यात धबधबे व धुक्यामुळे सुंदर दिसणारी दरी.
8. अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी, जवळच):
हेमाडपंती शैलीतील प्राचीन शिवमंदिर (११व्या शतकातील).
📩 आमच्याशी संपर्क साधा
तुमच्या प्रश्नांसाठी, सूचना किंवा माहितीकरिता खालील फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधा. आम्ही लवकरच प्रत्युत्तर देऊ.
(FAQ)
बागलाण वारंवार विचारले जाणारे प्रश्न
पंचायत समिती बागलाण ही बागलाण तालुका, नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्यात स्थित आहे. नाशिक शहरापासून सुमारे ८४ कि.मी. अंतरावर आहे.
कार्यालय वेळ:
🕙 सकाळी १०:०० ते सायं. ०५:००
📅 रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद राहते.
📞 गटविकास अधिकारी संपर्क: 9423329186
📞 सहाय्यक गटविकास अधिकारी संपर्क: 9423019569
📧 ई-मेल: bdobaglan@gmail.com
बागलाण तालुक्यातील प्रमुख शहरी केंद्र म्हणजे सटाणा शहर होय.
काही छायाचित्र





संपर्क
पंचायत समिती बागलाण -
पत्ता -
बागलाण , नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
संपर्क क्रमांक -
9423329186 (ग.वि.अ संपर्क क्रमांक)
9423019569 (सहा.ग.वि.अ संपर्क क्रमांक)
ई -मेल -
bdobaglan@gmail.com
जिल्हा परिषद, नाशिक
जिल्हा परिषद, नाशिक / प्रकल्प संचालक
(सामान्य प्रशासन)
(ग्रामपंचायत)
(पाणी व स्वच्छता)
(सामाजिक व आरोग्य)
(प्राथमिक/माध्यमिक)
(सार्व.१,२,३,४)
(बांधकाम/पाणी/प्रकल्प)